Pune News : शेततळ्यात बुडणाऱ्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पित्याचाही करूण अंत; गावावर शोककळा

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शिरूर तालुक्यातील पंचतळे परिसरात खेळता खेळता दीड वर्षांचा चिमूरडा शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी वडिलांनी तळ्यात उडी मारली. मात्र पोहता येत नसल्याने दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

पती आणि मुलगा बुडताना पाहून पत्नीने ही शेततळ्यात उडी मारली होती. ती सुद्धा बुडत होती, मात्र या महिलेने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिक धावून आले आणि त्यांनी या मुलीला सुखरूप बाहेर काढले. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

सत्यवान शिवाजी गाजरे (वय 25) आणि राजवंश सत्यवान गाजरे (दीड वर्षे) अशी मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी बाप-लेकांची नावे आहेत. तर स्नेहल सत्यवान गाजरे या महिलेला स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गाजरे कुटुंबीयांचे शिरूर जवळ काही अंतरावर पंचतळे येथे चारंग बाबा कृषी पर्यटन केंद्र आणि मंगल कार्यालय आहे. याच परिसरात वीस फूट खोल शेततळे आहे. सोमवारी सायंकाळी सत्यवान कुटुंबीय कृषी पर्यटन केंद्रात आले होते. यावेळी खेळता खेळता नजर चुकवून चिमुरडा राजवंश शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी सत्यवान यांनी उडी मारली मात्र पोहता येत नसल्याने ते देखील बुडाले.

TakaTak Gang : वर्दळीच्या डेक्कन परिसरात ‘टकटक गँग’ पुन्हा सक्रिय

दरम्यान मुलगा आणि पती डोळ्यासमोर बुडत असल्याचे पाहून स्नेहल यांनी देखील शेततळ्यात उडी मारली. परंतु त्या देखील बुडू लागल्या. त्यांच्या ओरडण्याचा आवाज नाही त्या परिसरात असणारे स्थानिक नागरिक शेततळ्याकडे धावत आले आणि त्यांनी तिघांनाही पाण्यातून बाहेर काढले. तिघेही बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सत्यवान आणि राजवंश यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.