Pune News: देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने आरोग्य शिबिराचे आयोजन

पुणेकरांच्या आरोग्य संपन्नतेसाठी शिबिराचं आयोजन

एमपीसी न्यूज: रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे असे मानून प्रत्येक कार्यकर्त्याने सेवाभावी वृत्तीने काम करावे व सामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवाव्यात असे आवाहन भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले.(Pune News) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या बावन्नाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात 520 ठिकाणी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आली आहेत.

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी आरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आले आहे. त्या माध्यमातून पुणेकरांना आरोग्यसंपन्नतेची भेट देत आहोत असेही जगदीशजी मुळीक म्हणाले. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशन, मुकुलमाधव फाउंडेशन यांनी आज देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लायन्स क्लब ऑफ पुणे टवेंटी फर्स्ट  सेन्चयुरी च्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरात ते बोलत होते.

यावेळी आरोग्य तपासणी शिबिराचे संयोजक माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, लायन्स चे माजी प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, अध्यक्ष प्रतिभा खंडागळे,मुकुलमाधव फाउंडेशन चे जितेंद्र जाधव, योगेश रोकडे, यांच्यासह पुणे शहर सरचिटणीस दीपक पोटे, राजेश येनपुरे, शहर चिटणीस प्रशांत हरसूले, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, सरचिटणीस दिनेश माथवड,माजी नगरसेवक जयंत भावे,ऍड. मिताली सावळेकर,प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे, सरचिटणीस निलेश गरुडकर, (Pune News) ऍड. प्राची बगाटे,मुकेश अनिवसे,जयश्रीताई तलेसरा, संगीताताई शेवडे,चंद्रप्रभा खिलारे,प्रतीक खर्डेकर,शंतनू खिलारे,गिरीष खत्री, साहिल अभंगे, रामदास गावडे,कल्याणी खर्डेकर,यांच्यासह लायन मालन देवरे, लायन शमा गोयल, लायन माधुरी पंडित, लायन सतीश राजहंस, लायन अभय गांधी, लायन संतोष देवरे, लायन प्रसन्ना भांडारकर, लायन किरण रोझटकर ई मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्काय हेल्थकेयर चे डॉ. मंदार देव वा त्यांच्या टीम ने रक्त तपासणी, ई सी जी, डोळे तपासणी, संपूर्ण आरोग्य तपासणी केली वा नागरिकांना वैद्यकीय सल्ला दिला.

 

Dehuroad : व्यवसायात भागीदारी करणे पडले महागात

 

तर संजीवन रुग्णालयाचे डॉ.रवींद्र जोशी वा त्यांच्या टीम ने इसीजी सुविधा उपलब्ध करून दिली. स्त्रीरोग तज्ञ डॉ. मंदार रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.एरंडवणे प्लॉट नंबर 17, खिलारेवाडी, भालेकर चाळ येथील नागरिकांसाठी हे शिबीर आयोजित केले असून या माध्यमातून वस्ती विभागातील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याचा क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन चा हेतू असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.

 

वस्तीतील नागरिक प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात व महागड्या औषधोपचाराकडे पाठ फिरवतात त्यामुळे शासकीय रुग्णालयातील मोफत उपचारासह स्वयंसेवी संस्थांनी देखील सामान्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे आवाहन संदीप खर्डेकर यांनी केले. (Pune News) येणाऱ्या काळात रुग्णांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अधिक कार्य करणार असल्याचे ही ते म्हणाले. सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक तर संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.