Pune News : कोल्हापूरमधून पळून आलो नाही ; पुन्हा कोल्हापुरातून विजयी होईन ! : चंद्रकांतदादा पाटील यांचा दावा

एमपीसी न्यूज : ऐन विधानसभा निवडणुकीत मी कोल्हापूरमधून पळून आलो, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. पण आजही कोणत्याही विद्यमान आमदाराने राजीनामा द्यावा, मी कोणत्याही मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढून विजयी होईन, असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.

म्हात्रे पूल येथील शुभारंभ लॉन्स येथे कोथरूड विधानसभा मतदारसंघात आमदार झाल्याबद्दल वर्षपूर्ती अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलात होते. महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेता धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आदींसह भाजपाचे सर्व नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

पाटील पुढे म्हणाले, अमित शाह यांच्या आदेशानुसार मी कोथरूडमधून लढलो. कोथरूड विधानसभेतून निवडणूक लढविण्याची घोषणा झाल्यानंतर माझ्या जातीचा उल्लेख करण्यात आला. मला विरोधकांनी कोल्हापुरातून पळून आलेले, असा आरोप केला. पण मी कोल्हापुरातून पळून आलेलो नाही. तर माझं आव्हान आहे कोणत्याही विद्यमान आमदारांनी राजीनामा दयावा, पुन्हा निवडणूक घ्यावी. मी पुन्हा कोल्हापूरच्या कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडून येईन, नाहीतर हिमालयात जाईन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.