Pune News: माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं कोरोनामुळे निधन

Pune News: Former Mayor Datta Ekbote passes away गरीबांचे लढाऊ नेते अशी ओळख असलेले एकबोटे हे समाजवादी विचारांचे होते. समाजवादी पक्ष, जनता पक्ष आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्य उपाध्यक्ष म्हणून काम केले.

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गोविंद तथा दत्ता एकबोटे यांचे मध्यरात्री सव्वा बाराच्या दरम्यान कोरोनाने ससून रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातू  असा परिवार आहे.

गरीबांचे लढाऊ नेते अशी ओळख असलेले एकबोटे हे समाजवादी विचारांचे होते. समाजवादी पक्ष, जनता पक्ष आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्य उपाध्यक्ष म्हणून काम केले. कष्टकऱ्यांसाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली आणि तुरुंगवासही भोगला.

आणीबाणीतही हे स्थानबद्ध होते. गोल्फ क्लब आणि खराडी इथे विडी कामगारांसाठीची शेकडो घरे त्यांनी उभारली. राणाप्रताप उद्यानात त्यांच्या पुढाकाराने एसएम जोशी यांचा पूर्णाकृती पुतळा त्यांनी उभारला. महात्मा फुले पेठेतून ते निवडून येत.

_MPC_DIR_MPU_II

नुकतेच त्यांच्यात ज्येष्ठ मुलीचे आणि तरुण मुलाचे कोरोनाने निधन झाले आहे. एकबोटे यांना कोरोना झाला हे समजताच त्यांनी अनेक रुग्णालयाशी संपर्क साधला. पण त्यांना कुठेच जागा उपलब्ध झाली नाही. अखेर त्यांना ससून रुग्णालयात दाखल व्हावे लागले. तिथेही त्यांना योग्य उपचार मिळत नव्हता.

माजी नगरसेविका मीनाक्षी काडगी यांनी गिरीश बापट, अजित पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सुविधा उपलब्ध झाल्या आणि गांभीर्याने उपचार केले गेले.

निधनानंतरही त्यांच्या अंत्यसंस्कारात अडचणी निर्माण झाल्या. निधनानंतर त्यांचं पार्थिव प्रथम कैलास स्मशानभूमीत नेण्यात आले. तिथे जागा नसल्याने त्यांना येरवडा इथं नेण्यात आले आणि त्यानंतर कोरेगाव पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.