Pune News : लॉकडाऊनचा सदुपयोग ! कोथरूड मधील प्रज्ञा जगदाळेने मिळवलीअमेरिकेची नेक्स्ट जिनियस शिष्यवृत्ती

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊन मध्ये सर्वजण घरात बसून होते. यावेळेचा सदुपयोग करून कोथरूड मधील प्रज्ञा जगदाळे हिने अमेरिकेची नेक्स्ट जिनियस ही शिष्यवृत्ती मिळवली आहे. अमेरिकेतील मिल्सॅप्स विद्यापीठाची 1 लाख 33 हजार डॅालर्सची ही शिष्यवृत्ती आहे.

लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून प्रज्ञाने त्याचे संधीत रूपांतर केले. प्रज्ञाने आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या ‘ब्रेन-बी’ या परिक्षेत यश मिळवले आहे. अमेरिकेतील सायकालॉजिकल असोसिएशन यांच्या मार्फत ही परिक्षा घेतली जाते. तिची युवा विकास कार्यक्रम इंटर्नशिप अंतर्गत जॉर्जटाऊन विद्यापीठात लीडरशिप इनिशेटीव्ह इंटर्न म्हणून काम करण्यासाठी निवड झाली आहे. 17 ऑगस्ट रोजी प्रज्ञा अमेरिकेत जाणार असून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नायजेरियात तिला काम करण्याची संधी मिळणार आहे.

याशिवाय प्रज्ञा जगदाळे हिने इतर अनेक ठिकाणी यश मिळवले आहे. तिला डी. सी. रिचर्डसन शिष्यवृत्ती मिळाली आहे. प्रगत वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य इंटर्नशिपसाठी तिला 2,250 डॉलर्सची शिष्यव़ृत्ती मिळाली आहे. जगातून केवळ पाच विद्यार्थ्यांची यासाठी निवड झाली तर, भारतातून एकमेव प्रज्ञाची निवड झाली आहे.

प्रज्ञाने इंडियन कैान्सिल फॉर प्रोफेशनल एज्युकेशन मिशन अंतर्गत ग्राफोलॉजी (मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून आपल्या हस्तलेखनाचे विश्लेषण) हा कोर्स केला आहे. याशिवाय प्रज्ञाला गिटार, व्हायोलिन, उकुलेली आणि पियोनो वाजवण्याचा छंद आहे.

‘प्रज्ञाने लॉकडाऊनच्या काळात खूप कष्ट घेतले. सतरा – सतरा तास ती अभ्यास करत होती, ऑनलाईन शिक्षण घेत होती. तिचे अथक परिश्रम, निरंतर प्रयत्न आणि बौद्धीक क्षमता यामुळे तिला या यशापर्यंत पोहोचता आले,’ अशी भावना प्रज्ञाचे वडील डॉ. प्रशांत जगदाळे यांनी व्यक्त केली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.