Pune News: कांदा, बटाटा, लसूण, टोमॅटो, शेवगा, मटार, कारली, दोडका महाग

पालेभाज्यांची आवक चांगल्या प्रमाणात वाढली. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यात वाढलेले बहुतांश पालेभांज्यांचे भाव आवाक्यात आले आहेत. मुळा  व कांदापातच्या दरात काहीशी तेजी असली तरी उर्वरित पालेभाज्यांचे भाव आवाक्यात आले आहेत.

एमपीसी न्यूज – पुण्यात गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील तरकारी विभागात रविवारी (दि. 6) सर्व प्रकारच्या फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. कोरोना काळात वाहतुकीवरील निर्बंध उठले आहेत. त्यामुळे परराज्यातही शेतमाल जाण्यास सुरू झाला आहे. शहरातही मागणी वाढल्याने कांदा, बटाटा, लसूण, टोमॅटो, शेवगा, मटार, कारली, दोडका यांच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली. तर, मागणी व पुरवठा यातील समतोलामुळे इतर फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

तरकारी विभागात 90 ते 100 ट्रक शेतमालाची आवक झाली. परराज्यांतून आलेल्या मालामध्ये बंगळूरु मधून 1 टेम्पो मटार, गुजरात, कर्नाटकातून 2 ते 3 टेम्पो कोबी, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, इंदूरहून 9 टेम्पो गाजर, कर्नाटकातून 2 टेम्पो भुर्इमुग शेंग, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश येथून 2 टेम्पो शेवगा, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची 14 ते 15 ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून सातारी आले 1100 ते 1200 पोती, मटार 100 गोणी, भेंडी 8 ते 10 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, सिमला मिरची 8 ते 10 टेम्पो, हिरवी मिरची 2 ते 3 टेम्पो, टोमॅटो 1500 ते 1600 क्रेट्स, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, भुईमुग शेंग 100 ते 125 पोती, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, पावटा 3 ते 4 टेम्पो, कांदा 100 ते 125 ट्रक, बटाटा आग्रा इंदूरहून 30 ट्रक इतकी आवक झाली, अशी माहिती आडते विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : 180-210, बटाटा : 250-300, लसूण : 600-1300, आले : 250-300, भेंडी : 200-250, गवार : 300-400, टोमॅटो : 250-300, दोडका : 300-400, हिरवी मिरची : 300-400, दुधी भोपळा : 100-160, चवळी : 150-200, काकडी : 100-160, कारली : हिरवी 300-400, पांढरी 200-250, पापडी : 150-200, पडवळ : 160-180, फ्लॉवर : 150-200, कोबी : 100-150, वांगी : 200-250.

_MPC_DIR_MPU_II

डिंगरी : 150-200, नवलकोल : 80-100, ढोबळी मिरची : 250-320, तोंडली : कळी 400-450, जाड : 200-220, शेवगा : 400-800, गाजर : 140-180, वालवर : 200-250, बीट : 80-100, घेवडा : 300-400, कोहळा : 100-120, आर्वी : 180-200, घोसावळे : 140-160, ढेमसे : 200-220, पावटा : 250-300, भुईमूग शेंग : 350-400, मटार : स्थानिक 1000, परराज्य 900-1100, तांबडा भोपळा : 80-100, सुरण : 180-200, मका कणीस : 60-100, नारळ (शेकडा) : 1000-1800.

पालेभाज्या झाल्या स्वस्त

पालेभाज्यांची आवक चांगल्या प्रमाणात वाढली. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यात वाढलेले बहुतांश पालेभांज्यांचे भाव आवाक्यात आले आहेत. मुळा  व कांदापातच्या दरात काहीशी तेजी असली तरी उर्वरित पालेभाज्यांचे भाव आवाक्यात आले आहेत. कोथिंबीरची तब्बल अडीच लाख जुडी, तर मेथीची 1 लाख जुडी इतकी आवक झाली.

पालेभाज्यांचे भाव शेकडा जुडी : कोथिंबीर : 200-800, मेथी : 600-1200, शेपू : 500-800, कांदापात : 1000-1200, चाकवत : 700-800, करडई : 600-800, पुदिना : 400-500, अंबाडी : 700-800, मुळे : 1000-1200, राजगिरा : 500-700, चुका : 800-1000, चवळई :700-800, पालक : 500-700.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.