Pune News : पीएमपीएमएलचा कात्रज ते वांगणीवाडी आणि हडपसर ते संकेत विहार असे दोन नवीन बसमार्ग सुरू

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या वतीने कात्रज ते वांगणीवाडी (मार्ग क्रमांक 296 अ) आणि हडपसर ते संकेत विहार (फुरसुंगी) (मार्ग क्रमांक एच 11) असे दोन नवीन बस मार्ग सुरू करण्यात आला आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते या बससेवेचे आज (सोमवारी, दि. 30) उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी पुण्याच्या माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, कात्रज आगार व्यवस्थापक विजय रांजणे हे उपस्थित होते.

कात्रज ते वांगणीवाडी (मार्ग क्रमांक 296 अ ) या बस सेवेचा मार्ग कात्रज, शिंदेवाडी, वेळू, शिवापुर, वरवे, केळवडे, चेलाडी फाटा, नसरापूर गाव, माळेगाव, वीरवाडी जांभळी, कुरुंगवडी फाटा, आंबवणे, करंजवणे, मांगदरी, निगडे, वांगणी गाव, वांगणीवाडी असा असणार आहे.

हडपसर ते संकेत विहार (मार्ग क्रमांक एच 11) या बससेवेचा मार्ग हडपसर गाडीतळ, भाजी मंडई, काळे कॉलनी, गणेश विहार, समृद्धी हॉटेल, न्हावले वाडा, महादेव मंदिर, रेल्वे गेट, ड्रीम आकृती सोसायटी, ड्रीम रचना, ढेरे कंपनी, संकेत विहार असा असणार आहे. सध्या ही बस सेवा दर तासाला उपलब्ध असून प्रवासी संख्या व उत्पन्न वाढल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढवल्या जाणार आहेत.

याप्रसंगी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पीएमपीएमएलने पुणे शहरालगतच्या तालुक्यांमधील गावांमध्ये जिथे मागणी होईल तिथे नवीन बसमार्ग सुरू केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा देखील सार्वजनिक वाहतूक सेवेचा प्रश्न कायमचा दूर होणार आहे. कात्रज ते वांगणीवाडी या नवीन बस मार्गामुळे या मार्गावरील शेतकरी, दूध व्यावसायिक, विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी या सर्वांनाच शहरात ये-जा करणे सोयीचे होणार असल्याचे मोहोळ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.