Pune News : ‘पीएमपीएमएल’ची आता ई-कॅब सेवा

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) च्या वतीने पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये ठराविक अंतरासाठी प्रवाशांना ई-कॅब सेवा देण्याचे नियोजन केले आहे. इतर कंपन्यांच्या कॅब आणि रिक्षाच्या तुलनेत ही सेवा स्वस्त असेल, असा दावा केला जात आहे. पहिल्या टप्प्यात 100 ते 200 मोटारी पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल होऊ शकतात.

विमानतळ, एसटी, रेल्वे स्थानक तसेच बाजारपेठेत जाण्यासाठी या कॅब प्रवाशांना उपलब्ध असतील. तसेच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा उपयुक्त असेल. पुणे दर्शन किंवा पिंपरी चिंचवड दर्शनही पीएमपीएमएलच्या या ई-कॅबच्या माध्यमातून प्रवाशांना उपलब्ध होऊ शकते.

दरम्यान, याबाबत पीएमपीएमएलच्या वतीने अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पीएमपीएमएलचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर, वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी याबाबत आद्याप काही माहिती नसल्याचे सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.