Talegaon News : तळेगाव, पिंपरी येथे दोन घरफोड्या

तीन लाख 88 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे आणि पिंपरी येथे घरफोडीच्या दोन घटना घडल्या. तळेगाव येथील घटनेत अज्ञात चोरट्यांनी 26 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. तर पिंपरी येथील घटनेत तीन लाख 62 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी सोमवारी (दि. 4) तळेगाव दाभाडे आणि पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कमलादेवी देवेंद्रसिंग पिलखवाल (वय 40, रा. गंगा रेसिडेन्सी, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूम मधील कपाटाचे लॉकर तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 26 हजारांचा ऐवज चोरून नेला. पोलीस नाईक तोडकर तपास करीत आहेत.

रवी खिल्लूमल ओचानी (वय 40, रा. नव महाराष्ट्र शाळेजवळ, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवारी (दि. 3) रात्री साडेआठ ते पावणे बारा वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराच्या टेरेसच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूम मधील कपाटात ठेवलेली तीन लाख 62 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली. पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.