Pune News : मध्यवर्ती पेठांसह शिवाजीनगर, औंध परिसरात पावसाची हजेरी !

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र आणि कर्नाटक समुद्रकिनारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याच्या प्रभावामुळे अरबी समुद्रकिनारी हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच चक्राकार वाहणाऱ्या वाऱ्याची स्थिती आणि बाष्पाचा पुरवठ्यामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे.

त्यामुळे अचानक थंडी गायब झाल्यानंतर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

भारतीय हवामान विभाग आणि पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार येत्या 48 तासात राज्याच्या विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार मध्य पेठांसह शिवाजीनगर, औंध परिसरात जोरदार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

त्यानुसार आज सकाळी ऊन पडल्यामुळे नागरिकांनी पाऊस पडणार नाही, असे समजून रेनकोट, छत्र्या न घेता घराबाहेर पडले. दुपारी एकच्या सुमारास निरभ्र असलेल्या आकाशात काळे ढग जमले होते. आणि दोन सुमारास रिमझीम पाऊस सुरू झाला.

सायंकाळी 5 वाजता पुढे तासभर मात्र जोरदार पाऊस पडला. परिणामी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. तास दीड तासाभराच्या पावसामुळे निर्माण झालेल्या थंडाव्यामुळे दिवसभर उकाड्याने त्रस्त पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.