Pune News : ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय, गुन्हे शाखेच्या कारवाई तीन तरुणींची सुटका

एमपीसी न्यूज –  ‘स्पा’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकून तीन तरुणीची सुटका केली तर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार उघडकीस आला. सुफियान अहमद अली (वय 22) आणि अब्दुल मलिक मुफुर (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मोहम्मद अब्दुलहचिब (वय 22), अन्वर दाऊद भाई अहमदाबादी (वय 68) आणि शबनम सुलेमान शेख (वय 32) हे तिघे फरार आहे. 

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सामाजिक सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांना विमाननगर परिसरातील मेरियम बॉडी स्पा या ठिकाणी स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. यावेळी त्यांना या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले.

 

पोलिसांनी या ठिकाणाहून तीन मुलींची सुटका केली. आरोपी या तरुणींना पैशाचे आमिष दाखवून मसाज सेंटरच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.