Pune News: पुणे हे विद्येचे माहेरघर तसेच समाजसेवेची पंढरी – चित्राताई वाघ

एमपीसी न्यूज: मुलींनी समाजात आत्मविश्वासाने वावरावे आणि कोणत्याही परिस्थितीत शिक्षण अर्धवट सोडू नये असे आवाहन भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी केले.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रज्वलीत केलेली ज्ञानज्योत आपण तेवत ठेवली पाहिजे, जो शिकेल तोच टिकेल असा संदेश ही त्यांनी विद्यार्थिनींना दिला.

पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावावर असलेल्या शाळेत हा कार्यक्रम होतो आहे याचे विशेष महत्व असून पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी जी अंत्योदयाची कल्पना मांडली ती प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांतदादा पाटील प्रत्यक्षात आणत आहेत याचा आनंद वाटतो. दादांनी कोरोना काळात केलेले कार्य अफाट असून, प्रदेशात अनेक ठिकाणी ज्यांना कोरोनाच्या संकटाचा फटका बसला, ज्यांचे छत्र हरपले अश्यांना चंद्रकांतदादांनी यथाशक्ती मदत केली व पक्षाच्या आपदा कोषातूनही मदत करा असे आवाहन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. दादा म्हणजे बाप माणूस आणि अश्या कार्यक्षम आणि संवेदनशील प्रदेशाध्यक्षांच्या टीम मध्ये मी काम करते याचा मला अभिमान वाटतो असेही चित्राताई म्हणाल्या.पुणे हे जसे विद्येचे माहेरघर आहे तसेच पुणे हे समाजसेवेची पंढरी देखील आहे. माझ्या ह्या वर्षातील कार्यक्रमांची सुरुवात ह्या सुंदर कार्यक्रमाने होते आहे आणि येथे तुम्हा मुलींच्या चेहऱ्यावरील हास्य मला वर्षभराची ऊर्जा देऊन गेले आहे असेही त्या म्हणाल्या.शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि भाजप चे प्रवक्ते, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी आयोजित केलेल्या ड्रेस वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी कोरोना काळात प्रत्येक घटकाला कर्तव्यभावनेतून मदत केली आणि त्यांनीच ही कल्पना मांडली की वस्ती विभागासह अनेक ठिकाणी मुलींना ह्या दोन वर्षाच्या कोरोनाच्या संकटकाळात अंगावर नवीन कपडे शिवता आले नाहीत, अश्या सर्वांना नवीन ड्रेस द्यावेत आणि त्यानुसारच आजच्या कार्यक्रमाचे नियोजन केले असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. चंद्रकांतदादांनी केवळ ड्रेस मटेरियल दिले असे नाही तर बचत गटाच्या महिलांना शिलाई मशीन घेऊन दिले व ड्रेस शिवण्याचे काम ही दिले असल्याचे मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी संयोजक शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, शहर सरचिटणीस नगरसेवक दीपक पोटे,शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर,नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,नगरसेविका वृषाली चौधरी,पेट्रोल डीलर असोसिएशन चे राष्ट्रीय प्रवक्ता अली दारुवाला,शहर चिटणीस प्रशांत हरसूले,कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर, महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, महिला मोर्चा उपाध्यक्ष पल्लवी गाडगीळ, जयश्री तलेसरा,सुप्रिया माझीरे,प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे, प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे, निलेश गरुडकर, ऍड. प्राची बगाटे,ओबीसी आघाडी अध्यक्ष रमेश चव्हाण,शंतनू खिलारे,उद्योग आघाडीचे प्रदेश सह संयोजक विश्वजित देशपांडे, शहर सरचिटणीस रामदास गावडे,युवा मोर्चा सरचिटणीस दीपक पवार, आर्थिक आघाडीच्या शहर अध्यक्ष भाग्यश्री बोरकर,पक्ष पदाधिकारी श्रीकांत गावडे, संगीता शेवडे, मंगलताई शिंदे,विठ्ठल मानकर,माणिकताई दीक्षित,अमर खंडागळे,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे, मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका शशिकला चव्हाण इ मान्यवर उपस्थित होते.यावेळी दीपक पोटे, पुनीत जोशी यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन, मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक तर शंतनू खिलारे यांनी आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.