Pune News : पुणे महानगरपालिका तयार करणार 5 हजार सीसीसी बेड्स !

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाची एकूण स्थिती पाहता खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड्स ताब्यात घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर बेड्सची उपलब्धता आणि भविष्यातील आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्सची गरज, यावर सविस्तर आढावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतला.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, 80 टक्के बेड्स ताब्यात घेतल्यानंतर जवळपास 7000 हजार बेड्स कोविडसाठी उपलब्ध होणार आहेत. शिवाय महापालिकेने सीसीसीचे 5 हजार बेड्स तयार करण्याचे नियोजन केले असून पैकी 1 हजार 250 बेड्स उपलब्ध झाले आहेत. शिवाय 1 हजार 450 बेड्सची तयारी सुरु आहे’.

डॅश बोर्ड अद्ययावत ठेवणे आणि गरजूंना कमीत कमी वेळेत बेड उपलब्ध करुन देण्यासंदर्भात महापौर मोहोळ यांनी प्रशासनाला सूचना केल्या. शिवाय लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून व्यापकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासही महापौरांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.