Pune News : पुण्याचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज – पर्वती जलकेंद्र पंपींग, लष्कर जलकेंद्र पंपींग,एस.एन.डी.टी., वारजे जलकेंद्र, नवीन,जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत व पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीने देखभाल,दुरवस्तीची कामे गुरुवारी (दि.26) रोजी करायची आहेत. त्यामुळे या दिवशी पुर्णदिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर शुक्रवारी (दि.27) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

पर्वती जलकेंद्र भाग – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर,राजेंद्रनगर,लोकमान्य नगर,पर्वती गाव, सहकारनगर,सातारा रोड परिसर,शिवाजी नगर परिसर,स्वारगेट परिसर,पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एस.एन.डी.टी. परिसर,एरंडवणा, संपूर्ण कोथरुड परिसर, डहाणूकर कोलनी,कर्वे नगर, सेमिनार झोनवरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर,ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर इत्यादी परिसर

 

लष्कर जलकेंद्र पंपीग भाग – लष्कर भाग,पुणे स्टेशन परिसर,मुळा रस्ता,कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता,गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी

 

चतु:श्रृंगी, एस.एन.डी.टी.,वारजे जलकेंद्र परिसर – भुसारी कोलनी, शास्त्रीनगर,बावधन, भुगाव रोड परिसर, सूस रोड,बाणेर, बालेवाडी, पाषाण,वारजे हाय वे परिसर, रामनगर, कर्वे रोड परिसर, एरंडवणा, कोथरुड,डेक्कन जिमखाना परिसर,जयभवानी नगर, सुतारदरा,डहाणूकर कोलनी, परमहंसनगर,कर्वेनगर, गांधी भवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कोलनी, हॅपी कोलनी, गोसावी वस्ती, कॅनॅल रोड,वारजे जकात नाका परिसर, शिवाजीनगर, भोसले नगर, घोले रोड, सेनापती बापट रोड,हनुमाननगर, जनवाडी,वैदुवाडी, वडारवाडी, रेव्हेन्यू कोलनी आदी

 

नवीन व जुने होळकर पंपींग भाग – मुळा रोड, खडकी,हरिगंगा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.