Pune News : एमएनजीएल व सीएनजीच्या दरात कपात

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीने (एमएनजीएल) पाइपद्वारे ( Pune News) पुरविण्यात येणाऱ्या घरगुती गॅस दरात प्रति एससीएममागे 5 रुपये 70 पैशांनी तर ‘सीएनजी’च्या (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) दरात प्रति किलो सहा रुपयांनी कपात केली आहे. या कपातीची अंमलबजावणी (दि,7 ) मध्यरात्रीपासून केली जाणार आहे. यानुसार आता एमएनजीएलचा घरगुती गॅस प्रति एससीएम 51 रुपये 30पैसे आणि सीएनजी प्रतिकिलो 86 रुपयांनी मिळणार आहे.केंद्र सरकारने गॅस दराबाबत पारेख समितीच्या शिफारसी स्विकारल्यानंतर ही दर कपात लागू झाली आहे. 

 

Pune News : ‘मोठा नट; साधा माणूस’ कार्यक्रमात उलगडला अभिनेते निळू फुले यांचा कलाप्रवास

 

एमएनजीएल कंपनीने घरगुती गॅस आणि सीएनजी दर कपातीची घोषणा शुक्रवारी (दि,7 ) सायंकाळी केली. या दर कपातीचा फायदा पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तळेगाव येथील ग्राहकांना होणार आहे. सध्या घरगुती गॅसचा दर प्रति एससीएम 57 रुपये तर, सीएनजीचा दर प्रति किलो 92 रुपये इतका होता. केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मान्यता दिल्यामुळे गॅस दराच्या कपातीची ही घोषणा करण्यात आल्याचे कंपनीच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

 

नैसर्गिक वायूच्या खरेदी किमतीत घट झाल्याने घरगुती गॅसच्या दरात ही कपात करण्यात आली असून कंपनीने कमी झालेल्या गॅसच्या किमतीचा फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे, असे यासंदर्भात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड ही कंपनी पुणे, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, चाकण आणि तळेगाव यासह राज्यातील धुळे, नाशिक, सिंधुदुर्ग आदी जिल्हयात गॅसचा पुरवठा ( Pune News) करत असते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.