Pune News: शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांचा पाय आणखी खोलात, पीडित तरुणीचा कोर्टात जाण्याचा इशारा

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्कार करून जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाला दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी त्यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. त्यानंतर यातील पिडीत तरुणीने पुण्यात पत्रकार परिषद घेऊन रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला.

रघुनाथ कुचिक प्रत्येक गोष्ट खोटं बोलत आहेत, आत्तापर्यंत मी गप्प होते कारण माझ्याकडे माझ्या डीएनए चाचणीचा रिपोर्ट नव्हता पण आता तो आला आहे आता रघुनाथ कुचिक यांनी सुद्धा आपली डीएनए टेस्ट करावी अशी मागणी रघुनाथ कुचीक यांच्यावर आरोप करणाऱ्या पीडितेने केली आहे. त्याचबरोबर माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते सगळे पुरावे घेऊन मी मुंबई हायकोर्टात जाणार असल्याचं देखील त्या पिडीतेने काल पुण्यात पत्रकार परिषद घेत सांगितलं आहे.

शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचीक यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका तरुणीने बलात्काराचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर रघुनाथ कुचीक यांनी एक चाचणी करत मी वडील होऊ शकत नाही असं वैद्यकीय रित्या सिद्ध झाला आहे असं सांगितलं होतं. मात्र रघुनाथ कुचीक यांनी केलेली ही टेस्ट खोटी असून माझा गर्भपात झालेलं बाळ त्यांचचं होता असा आरोप देखील पिडीतेने केला आहे.

या सगळ्या प्रकरणी काही दिवसांपूर्वी रघुनाथ कुछ यांच्या मुलीने , तरुणीची आरोप करत आहेत त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लगेचच ती मागणी मान्य देखील केली आहे आता त्यावर विचार होत असल्याचं सांगितलं होतं.

त्यावर बोलताना या पीडितेने मी अनेकदा रूपाली चाकणकर यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला पण त्यांनी मला उत्तर दिलं नाही. ज्याप्रमाणे रघुनाथ कुचिक यांच्या मुलीची मागणी मान्य झाली तसच न्याय मलाही मिळावा अशी अपेक्षा पीडित तरुणीने आज बोलताना व्यक्त केली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.