Pune News : पालिकेकडे स्मार्ट सिटीने केली 40 कोटीची मागणी

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटी योजनेच्या प्रकल्पांसाठी महापालिकेकडून दर वर्षी 50 कोटी रुपयांचा निधी दिलाजातो. यंदा स्मार्ट सिटीने पालिकेकडे 46 कोटींची मागणी केली होती. तरी महापालिकेने केवळ 40 कोटीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समोर ठेवला आहे. येत्या मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे.

केंद्र शासनाकडून स्मार्ट सिटी योजनेसाठी दरवर्षी 100 कोटींचे अनुदान देण्यात येते. तर, महापालिकेस प्रतिवर्षी 50 कोटींचा हिस्सा द्यावा लागतो तर उर्वरित प्रकल्पाचा निधी सिटीकडून कर्ज तसेच वेगवेगळ्या माध्यमातून उभारण्यात येत आहे. स्मार्ट सिटीकडून 2020-21 या आर्थिक वर्षासाठीचा हिस्सा महापालिकेकडे मागणी केली होती.

त्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने मार्चच्या स्थायी समितीसमोर ठेवला होता. मात्र, मार्च अखेरीच्या स्थायी समितीच्या दोन्ही सभा तहकूब झाल्याने हा प्रस्ताव 15 दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला होता.दरम्यान, या योजनेचे काम रडतखडत सुरू असल्याने सर्वपक्षीयांकडून स्मार्ट सिटीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.