Pune News : स्वारगेट मेट्रो स्टेशनला नानासाहेब पेशव्यांचे नाव द्यावे, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने मागणी

एमपीसी न्यूज – स्वारगेट येथे होणाऱ्या मेट्रो स्टेशनला श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचे नाव द्यावे, अशी मागणी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त शनिवारवाडा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने ही मागणी करण्यात आली.

कार्यक्रमाला आमदार माधुरी मिसाळ, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, योगेश समेळ संदीप खर्डेकर, प्रतिष्ठानचे सचिव कुंदन कुमार साठे, श्रीकांत नगरकर, माधव गांगल,जगन्नाथ लडकत, आनंद दवे, मकरंद माणकीकर, मनोज तारे, किशोर येनपुरे, रविंद्र कुलकर्णी उपस्थित होते.

माधुरी मिसाळ म्हणाल्या, सगळे युगपुरुष जाती-जातीमध्ये अडकले आहेत. या सगळ्या महापुरुषांना एकत्र आणायला हवे. नानासाहेब पेशवे यांचे पर्वतीवर वास्तव्य होते. त्यामुळे स्वारगेट मेट्रो स्टेशनला त्यांचे नाव द्यावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

प्रतिष्ठानचे सचिव कुंदन कुमार साठे म्हणाले, पुणे शहराचा विस्तार पेशवाई काळात नानासाहेब पेशवे यांनी केला. त्यांच्या काळात कात्रज ते शनिवारवाडा पाईपलाईन, पेठांचा विस्तार यामधून त्यांनी पुण्याचा विकास केला. आणि पुण्याला देशाची राजधानी बनविले. त्यामुळे स्वारगेट येथे होणाऱ्या मेट्रो स्टेशनला श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचे नाव द्या, अशी मागणी त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.