Tata Motors : 1 जानेवारीपासून टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती वाढणार

एमपीसी न्यूज – देशातील आघाडीची व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या व्यावसायिक वाहनांच्या किंमतीत 2.5 टक्के एवढी वाढ होणार असून, 1 जानेवारीपासून नवीन दरवाढ लागू होईल.

टाटा मोटर्सच्या वतीने याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, 1 जानेवारी 2022 पासून कंपनीने व्यावसायिक वाहन श्रेणीतील वाहनांची किंमत 2.5 टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे M&HCV, I&LCV, SCV आणि बस यांच्या किंमतीत वाढ होईल, असे कंपनीने म्हटले आहे.

स्टिल, अॅल्यूमिनियम आणि इतर कच्चा मालाच्या किंमती वाढल्या आहेत. तसेच, वाहन उत्पादनातील आवश्यक घटकांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे इनपुट खर्चात प्रचंड वाढ होत असल्याने वाहनांच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. असे टाटा मोटर्सने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.