Pune News : पुणे विद्यापीठातील अंतिम वर्षांच्या परीक्षा आजपासून ; प्रशासन सज्ज

एमपीसीन्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आजपासून ( सोमवारी ) सुरू झाल्या आहेत. त्यासाठी विद्यापीठातील संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत. बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. त्यानुसार ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतही दिली होती. आणि त्यानंतरच पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

या परीक्षेसाठी पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील दोन लाख विद्यार्थी ऑनलाइनद्वारे परीक्षा देणार आहेत. सुमारे तीन हजार तीनशे विषयांची ही परीक्षा होणार आहे.

दरम्यान, बॅकलॉग विद्यार्थ्यांनी ई-मेल आयडी न नोंदवल्यामुळे त्यांनी मॉक टेस्ट दिली नाही. त्यामुळे त्यांच्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यांची परीक्षा मंगळवारपासून सुरू होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.