Pune News : कोविड -19 संसर्गात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण

जागतिक योग दिन - 21 जून 2021

एमपीसी न्यूज : “भारतीय जीवनपद्धतीमध्ये निरोगी जीवनशैली टिकवून ठेवण्यास आणि रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यावर नेहमीच भर दिला आहे. परंतु या साथीच्या रोगाने आम्हाला आपल्या नाजूक रोगप्रतिकारक प्रणालीची जाणीव करून दिली आहे. आणि म्हणूनच आता त्याचे महत्त्व नेहमीपेक्षा जास्त जाणवले आहे. कोविड -19 संसर्गात योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच दैनंदिन जीवनात योगापध्दती अंगिकारण्याची आवश्यकता आहे, असे मत कोलंबिया एशिया हॉस्पिटलच्या फिजिओथेरपिस्ट डॉ. ज्योति वाघमारे यांनी व्यक्त केले.

कोविड -19 संसर्गातून बरे झालेल्या लोकांसाठी , त्यांचे आरोग्य परत मिळविणे आणि रोग प्रतिकारशक्ती निर्माण करणे विशेषतः महत्वाचे आहे. योग्य आहार आणि पुरेशा झोपे व्यतिरिक्त, पुन्हा आरोग्यदायी होण्यासाठी योगाची मदत होऊ शकते. कारण आसन ऊर्जा वाढविण्यास मदत करतात. कोरोना व्हायरस प्रामुख्याने मानवी श्वसन प्रणालीवर हल्ला करते. श्वसन प्रणाली आणि फुफ्फुसांच्या क्षमतेची नैसर्गिक म्यूकोसिलरी क्लीयरन्स यंत्रणा सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कपालभाती आणि प्राणायाम सारख्या श्वासोच्छवासाच्या व्यायामामुळे आपल्या श्वासोच्छवासाच्या कार्यप्रणाली सुधारण्यास मदत होऊ शकते.

रोगांच्या तीव्रतेमुळे रुग्णाच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. अशावेळी अनेक योग आसन विशेषत: फुफ्फुसांच्या पुनर्संचयित करण्यावर लक्ष केंद्रित करतात. योगासनांमुळे शरीराच्या सर्व पेशींमध्ये ऑक्सिजन समृद्ध रक्त पंप करण्यास मदत करते. तणाव व्यवस्थापित करण्यासाठी योग अत्यंत फायदेशीर आहे आणि त्यामुळे थकवा देखील दूर करते, असेही डॉ. ज्योति वाघमारे यांनी सांगितले.

डॉ. वाघमारे म्हणाल्या की, आयुष मंत्रालयाने असेही सुचवले आहे की कोविड -१९ च्या रूग्णांच्या मानसिक-सामाजिक पुनर्वसनामध्ये योगाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. विशेषतः अलगीकरण करणे. ही योग आसन रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात, एखाद्याचे शरीर आणि मन विश्रांती घेण्यास आणि कोविडनंतरच्या त्वरीत बरे होण्यास मदत करते. योगामुळे पचनसंस्था आणि हृदय गती सुधारण्यासही मदत मिळू शकते, जी संसर्गाच्या वेळी देखील प्रभावित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.