pune news : बेड्सचे नियंत्रण एकाच छताखाली आणा : महापौर मोहोळ

आरटी-पीसीआर चाचण्यांची क्षमता वाढवावी. यामुळे संसर्ग आटोक्यात आणण्यात मदत होऊ शकेल' असेही महापौर मोहोळ म्हणाले.

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात सामान्य नागरिकांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स मिळण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयातील बेड्सची माहिती आणि उपलब्धता एकाच छत्राखाली आणून बेड मिळण्यासाठी केंद्रीय पद्धतीचा अवलंब करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत केल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

या संदर्भात तातडीने कार्यवाही होण्याची शक्यता असून यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. कोरोना संसर्ग आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

त्यावेळी महापौर मोहोळ यांनी ही मागणी केली. यावेळी विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्सची मागणीही वाढत असून सर्वसामान्य रुग्णांना बेड मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

याबाबत महापौर मोहोळ म्हणाले, ‘रुग्णांचा बेड्स उपलब्ध होण्यासाठी तातडीने केंद्रीय पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे. ही पद्धत अवलंबल्यास रुग्णांना खाटा उपलब्ध होऊ शकतील.’

‘पुणे शहरात दररोज ६ हजार पेक्षा जास्त चाचण्या होत असल्या तरी त्यात सरकारी संस्थांकडून होणाऱ्या आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या तुलनेने कमी असून यावर तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे.

यासाठी आरटी-पीसीआर चाचण्यांची क्षमता वाढवावी. यामुळे संसर्ग आटोक्यात आणण्यात मदत होऊ शकेल’ असेही महापौर मोहोळ म्हणाले.

संसर्गाच्या अंदाजकडे महापौरांनी वेधले लक्ष !

कोरोना संसर्गाच्या सुरुवातीपासूनच्या काळात नजीकच्या काळातील अंदाज बांधून रुग्णसंख्या आणि संभाव्य बेड्सची माहिती बैठकीत उपलब्ध केली जात होती.

त्या आधारावर नियोजन करणे सहज शक्य होते. मात्र, गेल्या तीन बैठकांमध्ये ही माहिती सादर होत नसल्याने महापौर मोहोळ यांनी समोर आणले. विशेष म्हणजे जम्बो रुग्णालयाची निर्मिती याच अंदाजाच्या आधारावर करण्यात आली होती.

‘जम्बो’ आणि बाणेर केंद्र पूर्ण क्षमतेने लवकर लवकर सुरु करा : महापौर

‘जम्बो’चा गाडा आता रुळावर येत असला तरी नियोजित क्षमतेनुसार जम्बो आणि बाणेर केंद्राचे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स कमीत कमी कालावधीत उपलब्ध करा, अशीही सूचना महापौर मोहोळ यांनी बैठकीत केली. जम्बो आणि बाणेरचे केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यास पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.