Pune: पुण्यातील 250 धोकादायक वाडे-इमारतींना नोटिसा

Pune: Notice to 250 dangerous buildings, wada's in Pune प्रतिबंधित व प्रतिबंधित भागाच्या बाहेरील इमारती अशी विभागणी करण्यात आलेली आहे. यामध्ये 20 इमारती पाडण्यात आल्या आहेत.

एमपीसी न्यूज- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने खबरदारी घेतली आहे. आतापर्यंत 250 धोकादायक वाडे आणि इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर, दोन महिन्यांत पुणे शहरातील 20 धोकादायक वाडे व इमारती पाडण्यात आल्या आहेत.

धोकादायक वाडा आणि इमारतींची दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले आहे. पण, कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असल्याने काहीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता महापालिकेनेच हे धोकादायक वाडे व इमारती पाडण्याची कारवाई सुरू केली आहे, अशी माहिती बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत यांनी दिली.

प्रतिबंधित व प्रतिबंधित भागाच्या बाहेरील इमारती अशी विभागणी करण्यात आलेली आहे. यामध्ये 20 इमारती पाडण्यात आल्या आहेत. इमारतीत राहणाऱ्या रहिवाश्यांना जागा रिकाम्या करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

त्या मालमत्तांवर दावे ठेवण्यासाठी भाडेकरूंना महापालिकेतर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दरम्यान, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच महापालिकेतर्फे अनेक उपाययोजना करायला सुरुवात झाली आहे.

आपत्ती व्यवस्थापन सज्ज ठेवण्यात आला आहे. शहरात पाऊस झाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याचे दिसून येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.