Pune : सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांचे निधन

एमपीसी न्यूज – पुणे शहर पोलीस आयुक्तलयात सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत( Pune) असणारे अशोक धुमाळ यांचे निधन झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. काही दिवसापूर्वी इमारतीवरून खाली पडल्याने त्यांना भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. घरी असताना त्यांची आज प्रकृती अस्थिर झाली होती. दुपारी उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिक येथे त्यांना आणण्यात आले होते. यावेळी प्रकृती नाजूक झाल्याने त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. रात्री अशोक धुमाळ यांच्या शरीराने उपचारास प्रतिक्रिया देण्याचे बंद केले होते  व रात्री 9.30 दरम्यान त्यांचे निधन झाले.

Today’s Horoscope 30 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

अशोक धुमाळ यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. यापूर्वी कुख्यात गुंड बंडू आंदेकर व टोळीला मोक्का गुन्ह्यातून जामीन मिळाल्याने सपोआ अशोक धुमाळ चर्चेत आले होते. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे आंदेकर टोळीला मोक्का गुन्ह्यातून जामीन मिळाला असा खोचक टोला कोर्टाकडून लावण्यात आला होता. गुंड बंडू आंदेकर व टोळीला मोक्का गुन्ह्यातून जामीन या कारणावरून अशोक धुमाळ अस्वस्थ असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले ( Pune) जाते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.