Pune News : जागतिक बालहक्क दिनानिमित्त पुण्यात बाल स्नेही कक्षांचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – २० नोव्हेंबर जागतिक बालहक्क दिन म्हणून साजरा होतो. याच महत्त्वपूर्ण दिनाचे औचित्य साधून पुण्यात बाल स्नेही कक्षांचा उद्घाटन सोहळा पार पडला. पोलिस यंत्रणा बाल स्नेही करण्याच्या अनुषंघाने या कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते बालस्नेही कक्षांचे उद्घाटन करण्यात आले. 

बाल न्याय कायदा २०१५ अंतर्गत मुलांसाठी काम करणाऱ्या सर्व संस्था बालस्नेही राहाव्यात यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहेत. गुन्हा केलेल्या अल्पवयीन मुलांसाठी बालस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, असे माहिती पत्रकात म्हटले आहे

पुणे शहरातील पोलिस आयुक्तालयाअंतर्गत सिंहगड रोड पोलिस स्टेशन, दत्तवाडी पोलिस स्टेशन, अलंकार पोलिस स्टेशन, कोथरूड पोलिस स्टेशन, वारजे – माळवाडी स्टेशन आणि उत्तमनगर पोलिस स्टेशन येथे बाल स्नेही कक्ष सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान उद्घाटन प्रसंगी उदघाटन प्रसंगी होप फॉर द चिल्ड्रन फॉऊडेशनच्या संस्थापक व मुख्याधिकारी कॅरोलिन वॉल्टर पुणे पोलीस सायकालॉजी वेल बिइग ग्रुपच्या सदस्या गायत्री कोटबागी व अभिनेत्री पर्ण पेठे, लायन्स क्लब ऑफ पुणे याचे अभय जोशी, राष्ट्रीय बाल संरक्षक आयोगिचे माजी सदस्य श्रीमती रूपा कपुर , जिल्हा बाल संरक्षण विभागाचे सभासद परमानंद, पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.