India Corona Update : देशाचा दैनंदिन व आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट एक टक्यापेक्षा कमी

एमपीसी न्यूज – भारतात कोरोना संसर्गाचा विळखा सैल होताना दिसत असून, मागील काही दिवसांपासून देशाचा दैनंदिन व आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट एक टक्यापेक्षा कमी नोंदवला आहे. सध्या दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 0.98 तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट 0.94 टक्के एवढा आहे. मागील साठ दिवासांपासून तो दोन टक्क्याच्या खाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 10 हजार 488 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 12 हजार 329 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 45 लाख 10 हजार 413 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 39 लाख 22 हजार 037 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.30 टक्के एवढा झाला आहे.

देशात सध्या 1 लाख 22 हजार 714 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 532 दिवासांतील ही नीचांकी ॲक्टिव्ह रुग्ण संख्या आहे.

देशात गेल्या 24 तासांत 313 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे देशात आजवर 4 लाख 65 हजार 662 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे. आयसीएमआर’च्या आकडेवारीनुसार देशात आजवर 63.16 कोटी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 115 कोटी 50 लाख 55 हजार 210 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.