GST Hike News : नव्या वर्षापासून कपडे, चपला महागणार?

एमपीसी न्यूज – देशभरातून वाढत्या महागाईवर तोडगा काढा अशी मागणी असून सुद्धा पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. मोदी सरकारने चप्पल-कपडे आणि गारमेंट्सवर यावरील जीएसटी पाच टक्क्यांवरून  12 टक्के करण्यात आलाय. हे नवे दर नवे वर्ष 2022 पासून सुरू होणार आहे. 

केंद्र सरकारने नव्या वर्षांत पुन्हा सर्वसामान्यांना आर्थिक संकटात टाकले आहे. येत्या नव्या वर्षापासून चप्पल, कपडे यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. यापूर्वी कपडे आणि चप्पल यांवर सरकार 5 टक्के जीएसटी दर आकारत होते मात्र येणाऱ्या नवीन वर्षापासून नवे दर लागू करत जीसटी दर 12 टक्के करण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाने (CBIT) केली आहे.

दरम्यान, कपडे आणि चप्पलच्या जीएसटी दरवाढ करण्याबाबत शिफारस करण्यात आली होती त्यानुसार ही दरवाढ घोषित करण्यात आली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर ‘क्लॉथिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (CMAI) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कच्च्या मालाच्या किंमतीत झालेली वाढ आणि मालवाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे या उद्योगाला आधीच अडथळे येत असताना हा निर्णयामुळे कापड उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.