Pune  :  पाटील इस्टेट परिसरात 210 पैकी 202 कोरोनामुक्त; पंधरादिवसांपासून एकही रुग्ण नाही

Pune: 202 out of 210 patients corona free in Patil Estate area; Not a single patient since fortnight

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर भागातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पाटील इस्टेट परिसरात 210  पैकी 202  रुग्ण कोरोनामुक्त  तर मागील 15 दिवसांपासून  कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. या परिसरात पुणे महापालिका, पोलीस आणि प्रशासनातर्फे सामूहिक जबाबदारी पार पाडून चांगले प्रयत्न करण्यात आले. त्यामुळेच या भागातील परिस्थिती आटोक्यात आली आहे. यामध्ये काही सामाजिक संस्थांचाही वाटा महत्वपूर्ण आहे. 

या भागात 210  पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 202  रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, 4  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हा परिसर आता करोनामुक्त होणार असल्याचे सांगण्यात येते.  पाटील इस्टेट परिसरात कोरोनाचे 210  रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या भागातील 1  हजार 342 नागरिनकांची  कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांच्या संपर्कातील 600  रहिवाशांना निकमार बालेवाडी, पॉलिटेक्निक कॉलेज शिवाजीनगर, सिंहगड इन्स्टिट्यूट येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.

या भागात स्वयंसेवी संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, फूड पॅकेटस घरपोच पुरविण्यात आली. मुख्य रस्त्यालगत 38  ठिकाणी बॅरीकेडिंग करून भाग पूर्णत: सीलबंद करण्यात आला.

झोपडपट्टीत सार्वजनिक शौचालयांद्वारे होणारा करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 20  फिरती शौचालये उभारण्यात आली. कोरोना सार्वजनिक शौचालयातून मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे महापालिकेतर्फे या भागांत वारंवार स्वच्छता करण्यात येत आहे.

वाकडेवाडी बस स्टँड ते पाटील इस्टेट झोपडपट्टीकडे जाणाऱ्या मार्गावर एसआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली होती. विनाकारण फिरणाऱ्यांना प्रतिबंध घालण्यात आला.

तसेच ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते, अशा  विविध उपाययोजना करून कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेला हा पाटील इस्टेट परिसर आता या  कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.