Pune: पुणे लोकसभा निवडणूक ; येत्या काही दिवसांतच आचारसंहिता

एमपीसी न्यूज – पुणे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता (Pune)येत्या काही दिवसांतच जाहीर होणार आहे. मात्र, राजकीय पक्षांनी अद्यापही आपले उमेदवार जाहीर केले नाही. काँग्रेसतर्फे अर्ज मागविण्यात आले. तर, भाजपने सर्वे करण्यावर भर दिला. 
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे माहापालिका प्रशासनाने(Pune) मोठ्या प्रमाणात निविदा काढण्याचा सपाटा सुरू केला आहे.
काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना (ठाकरे गट) महाविकास आघाडी आणि भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) असा सामना रंगणार आहे. 2014 पासून पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी होत आहे. कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाल्याने विरोधी पक्षांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. तब्बल 20 जणांनी काँग्रेसकडे उमेदवारी मिळविण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.
भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस विजयी होऊ शकते. हा संदेश या निमित्ताने गेला आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक भाजपने अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. अब की बार 400 पार अशा प्रकारची घोषणा दिली आहे. महाराष्ट्रात 48 मतदारसंघावर लक्ष्य केंद्रित केले आहे.
पुणे लोकसभेसाठी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी खासदार संजय नाना काकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर यांचे नाव आघाडीवर आहे. तर, काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्या नावाची चर्चा आहे.
https://www.youtube.com/watch?v=sWUz8e8nQQg&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.