Maval : कुणे ना.मा. येथील 68 कातकरी व ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्रांचे वाटप

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आमदार सुनिल शेळके (Maval)यांच्या माध्यमातून आदिम सेवा अभियान राबवले जात आहे. त्याअंतर्गत कुणे ना.मा. येथील 68 कातकरी व ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्रांचे शनिवारी (दि. 17) वाटप करण्यात आले.

लोणावळा शहराच्या जवळ असलेल्या कुणे गावातील (Maval)ठाकर व कातकरी समाजातील अनेक नागरिकांकडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंरही जातीचे दाखले उपलब्ध नाहीत.शैक्षणिक कामांसाठी, शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असते.परंतु ज्यांचे पूर्वज शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होते.अशा कुटुंबातील नागरिकांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागतो व दाखला मिळत नसल्याने विविध शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागते.आजपर्यंत विविध शिबिरे, योजनांच्या नावाखाली केवळ कागदपत्रे जमा केली जातात.परंतु सर्व प्रक्रिया पूर्ण करुन दाखले कोणीही मिळवून देत नव्हते.त्यामुळे आश्वासनांशिवाय या नागरिकांच्या पदरात काहीच पडले नव्हते.

 

Maharashtra :प्रसिद्ध उर्दू कवी गुलजार यांच्यासह जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

परंतु आमदार शेळके यांनी आदिम सेवा अभियान प्रभावीपणे राबवित तालुक्यातील प्रत्येक वाडी-वस्तीवर जाऊन नागरिकांच्या कागदपत्रांची पूर्तता करुन घेणे व शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे यामुळे या नागरिकांना अखेर जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध झाले आहेत.अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जातीचे दाखले मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सागर उंबरे,सुरेश होले,अशोक गोजे, कमलबाई वाघमारे,अश्विनी वाघमारे, रामदास शेलार, माजी पंचायत समिती सदस्य महादू उघडे, अविनाश लोमटे, बाळू गोजे, हरीश तांडील, शंकर भस्मे, खंडू ठोंबरे, भागू होले,अनंता मेंगाळ, चंदर ठोंबरे, सागर गोणते, अमित शिवणेकर, यशवंत ठोंबरे, गणेश जाधव, बाळू होले व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.