Pune Rain : पुणे जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

एमपीसी न्यूज : राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी (Pune Rain)लावली असून पुणे जिल्हय़ातील अनेक भागात पाऊस सुरू आहे.त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पावसाच्या संदर्भात जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून त्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.

हवामानशास्त्र विभागाने जारी केलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित (Pune Rain) विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले की, मंगळवारपासून घाटमाथ्यावरही पाऊस पडत आहे.

जिल्ह्यात 23 गावे दरडप्रवण आणि 84 पूरप्रवण गावे आहेत. दरडप्रवण गावात दरडी कोसळण्याची शक्यता तसेच पूरप्रवण भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये.आपल्या भागात घटना घडल्यास तात्काळ नियंत्रण कक्षास कळवावे.

ते पुढे म्हणाले, सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या भागातील नियत्रंण कक्ष कार्यान्वित असल्याची दक्षता घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी आपले मुख्यालयस्थळ सोडू नये. नागरिकांना तातडीने उपचार मिळण्यासाठी आरोग्य केंद्रात पुरेसा औषधसाठा आणि वैद्यकीय उपकरणे अद्ययावत असल्याची दक्षता घ्यावी.

BJP : शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार – शंकर जगताप

मान्सूनच्या काळात विशेषत: सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता वाहतूकीचे योग्य नियोजन करावे. भोर, वेल्हा, मुळशी आणि मावळ या भागातील यंत्रणांनी सतर्क राहावे. धरणातील पाण्याची पातळी वाढल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो.

त्यामुळे नदी परिसरात पूरप्रवण गावातील नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्याची कार्यवाही करावी. आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.