BJP : शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार – शंकर जगताप

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा, विधानसभा तसेच (BJP) महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीला शत-प्रतिशत समर्थन मिळवून देण्यासाठी पक्षाचे शहरातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शंकर जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रमविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे व राज्यातील पक्षाच्या इतर नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत.

PCMC : ‘महापालिका कर्मचा-यांनी तंत्रज्ञानासोबत जुळवून घेत कार्यपध्दतींचा अवलंब करावा’

या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्याबरोबरच शहरात पक्ष आणि भक्कम करून संघटना वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे.

भारतीय जनता पार्टी ही कोणतीही निवडणूक आव्हान समजूनच लढत असते. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. शहरातील सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काम करणार आहे.

आज लाेकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांची खूप आठवण हाेत आहे. त्यांनी भाजपचे शहराध्यक्ष म्हणून काम करीत असताना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे विकासवादी विचार पिंपरी-चिंचवडमधील (BJP) नागरिकांमध्ये रुजवले.

शेवटच्या घटकाचा विकास हाच त्यांचा निर्धार हाेता. त्यांचा वारसा पुढे चालवण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे. नवी जबाबदारी स्वीकारताना केंद्र, राज्य सरकारच्या आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कल्याणकारी याेजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पाेहाेचवणे आणि विकासकामांना गती देण्याचा संकल्प आहे.

सर्व पक्षश्रेष्ठी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, राज्य स्तरीय लेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या साेबतीने आणि एकजुटीने संघटनात्मक बांधणी करुन पिंपरी-चिंचवडकरांच्या हितासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

PCMC : ‘महापालिका कर्मचा-यांनी तंत्रज्ञानासोबत जुळवून घेत कार्यपध्दतींचा अवलंब करावा’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.