Pune : टिळकरोडवरील इलेक्ट्रॉनिक दुकानात घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज : इलेक्ट्रॉनिक दुकानात घरफोडी करून अडीच लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी (दि.16) रात्री सव्वादहा नंतर सदाशिव पेठ येथील टिळक रोडवर असलेल्या सुयोग प्रसाद डिजिटल (सोनी सेंटर) येथे घडली.

याप्रकरणी विजय मंत्री (वय 36, रा.पर्वती पायथा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी यांचे टिळक रोड वरील सुयोग प्रसाद डिजिटल नावाचे इलेक्ट्रॉनिकचे दुकान रात्री कुलूप लावून बंद होते. दरम्यान चोरट्याने दुकानाच्या शटरला लावलेली दोन्ही कुलुपे तोडून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील काऊंटरचे ड्रॉव्हर उचकटून त्यातली 1 लाख 75 हजारांची रोकड, एक पाकीट, ब्लुटूथ हेडफोन, आणि एक मोबाईल असा एकूण 2 लाख 36 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.