Pune: संचारबंदी असतानाही भाजीपाला खरेदीसाठी झुंबड

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असतानाही पुण्यात गुलटेकडी मार्केटयार्ड येथे भाजी खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी करून आज कहरच केला.

शहरात किमान चार दिवस पुरेल एवढी भाज्यांची आवक झालेली असल्याने नागरिकांनी विनाकारण खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

जीवनावश्यक वस्तू म्हणून भाजी खरेदीसाठी जाण्यास संचारबंदीतही मुभा देण्यात आली आहे. त्याचा गैरफायदा उठवत नागरिकांनी मार्केटयार्ड येथे मंगळवारी सकाळी भाजी खरेदीसाठी एकच गर्दी केली. नागरिकांनी गर्दी करू नये, म्हणून वारंवार आवाहन करून देखील लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. लोखंडी बॅरिकेड्स  उभे करून पोलिसांनी गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला असता काहीशी चेंगराचेंगरी देखील झाली.

कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने गर्दी टाळावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तरी देखील लोक भाजी खरेदीच्या नावाखाली गर्दी करून कोरोना संसर्गाचा धोका वाढवत आहेत. अनेक नागरिक मास्क न लावताच गर्दीत वावरत असल्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

– पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 2,050  वाहनांमधून भाजीपाल्याची आवक. 
– काल 867 वाहनांमधून भाजीपाला आला होता.
– उद्यापासून ही बाजार समिती 31 मार्चपर्यंत बंद 
– भाजी खरेदीसाठी ग्राहकांनी आणि विक्रीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांची मोठी गर्दी 
– सुरूवातीला खरेदी-विक्रीचा हा व्यवहार शांततेत सुरू होता. 
– मात्र काही वेळात लोकांची गर्दी हाताबाहेर जाऊ लागल्याने पोलिसांना बोलवावं लागलं.  त्यानंतर गर्दी पांगली. आत्ता बाजार समितीसमोर पोलिसांचा बंदोबस्त आहे.

 

HB_POST_END_FTR-A2
You might also like