Pune : नवजीवन मित्र मंडळाचे सचिव सागर राऊत यांचे निधन

एमपीसी न्यूज – पुणे लष्कर भागातील नवा मोदीखाना भागातील नवजीवन मित्र मंडळाचे सचिव व  सामाजिक कार्यकर्ते सागर सुरेश राऊत (वय 36) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,दोन मुले,चार भावंडे असा परिवार आहे. ते पुणे आकाशवाणी केंद्र येथे नोकरीला होते

मुक्तीधाम, धोबीघाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नगरसेवक अतुल गायकवाड, नगरसेवक दिलीप गिरमकर, पुणे आकाशवाणी मधील त्यांचे सर्व सहकारी तसेच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like