_MPC_DIR_MPU_III

Pune : मेधा कुलकर्णी ‘तशा’ बोलल्या असतील तर मी माफी मागतो – संजय काकडे

एमपीसी न्यूज- आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा क्रांती मोर्चाकडून लोकप्रतिनिधीच्या घरासमोर केल्या जाणाऱ्या आंदोलनाला ‘स्टंट’ म्हणल्याचे पडसाद आजही पहायला मिळत आहेत. आमदार मेधा कुलकर्णी यांनी अशाप्रकारे वक्तव्य करायला नको होते, तसेच त्या अस काही बोलल्या असतील तर त्यांच्या वतीने आपण समाजाची माफी मागत असल्याचे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे म्हणाले आहेत.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

मराठा क्रांती मोर्चाकडून आज भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वतः काकडे यांनी आंदोलनात सहभाग घेत मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाबद्दल केलेल्या व्यक्तव्याबदल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलक महिलांनी केली. तसेच याबद्दलचे निवेदन त्यांनी संजय काकडे यांना दिले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.