Pune: श्रमिकांसाठी शहरातून आज सात रेल्वेगाड्या सोडणार

Pune: Seven trains will leave the city today for migrated workers

एमपीसी न्यूज – स्थलांतरित मजूरांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी रेल्वे खात्याने विशेष सोय केली असून आज सात श्रमिक विशेष गाड्या पुण्यातून सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.

श्रमिकांना मूळ गांवी सोडण्यासाठी पुणे विभागातून आत्तापर्यंत 28 रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. त्यात साताऱ्यातून चार, सांगलीतून तीन, कोल्हापूरमधून सहा, सोलापूरमधून दोन, पुण्यातून 13 गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या पाच जिल्ह्यांमधून आत्तापर्यंत 35 हजार 163 मजूरांना त्यांच्या गावी रवाना करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निश्चित करण्यात आलेल्या श्रमिक व त्यांच्या कुटुंबीयांनाच या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.  त्यामुळे कोणीही रेल्वेस्थानकावर गर्दी करू नये, असे म्हैसेकर यांनी स्पष्ट केले आहे. शासनाच्या आदेशानुसार या श्रमिक विशेष रेल्वेगाडीतून पाठविण्यात येणाऱ्या प्रवाशांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.