Pune : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्रीपाद बेदरकर यांची फेरनिवड

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार संघटनेच्या(Pune) अध्यक्षपदी कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाऊंटंट (सीएमए) श्रीपाद बेदरकर यांची फेरनिवड, तर उपाध्यक्षपदी प्रसाद देशपांडे, सचिवपदी ॲड. अनुरुद्र चव्हाण, खजिनदारपदी मिलिंद हेंद्रे, साहसचिवपदी ॲड. प्रणव शेठ यांची निवड करण्यात आली आहे.

संस्थेच्या ‘ज्ञानमंदिर’ सभागृहात नुकत्याच झालेल्या 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 2023-24 या वर्षीसाठीची कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

सदस्यपदी सीए स्वप्नील मुनोत, ज्ञानेश्वर नरवडे यांची फेरनिवड, तर नवनियुक्त सदस्यपदी ज्येष्ठ सदस्य कैलास काशीद यांची निवड झाली.

वर्षभरातील योगदानासाठी 2022-23 च्या कार्यकारिणीला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

यासह माजी अध्यक्ष सीएमए ब्रिजमोहन शर्मा व नरेंद्र सोनावणे यांना त्यांच्या भरीव योगदानासाठी ‘एमटीपीए मेरुमणी’ ही उपाधी बहाल करण्यात आली.

ज्येष्ठ सभासद सीए सुहास बोरा, माजी अध्यक्ष प्रकाश पटवर्धन आणि ज्येष्ठ सभासद व जीएसटीपीए साताराचे माजी अध्यक्ष राजगोपाल चांडक यांना ‘कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

उल्लेखनीय कार्यामुळे कर सल्लागार संघटना महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.

संस्थेचे दोन हजाराहून अधिक मान्यवर सभासद असून, वर्षभर कर सल्लागार, सनदी लेखापाल आदींना कर रचनेतील विविध बदल याबाबत मार्गदर्शन, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांबाबत सरकारच्या विविध योजना यासंदर्भात कार्यक्रम आयोजिले जातात.

 

संघटनेचे हे कार्य नेटाने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे श्रीपाद बेदरकर यांनी नमूद केले.

वर्षभरातील इतर उपक्रमात योगदान देणाऱ्या कर सल्लागारांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

यामध्ये आयकरासाठीच्या कायदा व निवेदन समितीमधील योगदानासाठी माजी अध्यक्ष व समिती प्रमुख संतोष शर्मा, क्रीडा समितीतील योगदानासाठी समन्वयक उमेश दांगट,

ट्रस्ट अनुपालन समितीतील योगदानासाठी माजी अध्यक्ष ॲड. व्ही. जी. शहा व मनोज चितळीकर, सर्टिफिकेट कोर्स इन टॅक्सेशन लॉमधील योगदानासाठी समन्वयक मिलिंद हेंद्रे, टॅक्स ट्रेब्युन या मुखपत्रासाठीच्या योगदानासाठी माजी अध्यक्ष व समिती प्रमुख ॲड. मिलिंद भोंडे, टॅक्स ट्रेब्युन या मुखपत्रासाठी उत्तम लेखक म्हणून ॲड. दिनेश तांबडे यांना गौरविण्यात आले.

सर्टिफिकेट कोर्स इन टॅक्सेशन लॉ (एमटीपीए व वायसीएलसी) साठी ॲड. अमोल माने, राष्ट्रीय कर परिषदेसाठी सीए बिमल जैन, महिला दिनासाठी सपना देव, स्टडी सर्कल व सेमिनारसाठी सीए स्वप्नील मुनोत, तर आउट स्टेशन सेमिनारसाठी ॲड. विद्याधर आपटे यांना उत्तम वक्ता या पुरस्काराने गौरविण्यात आले.

सीए योगेश इंगळे यांना सुपरस्टार व नयन निराली यांना ‘रायझिंग स्टार’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

‘एमटीपीए बेस्ट फ्रेंड’ म्हणून परभणीचे अध्यक्ष राजकुमार भांबरे, नाशिकचे सुनील देशमुख व मुंबईचे ॲड. आदित्य सुरते यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष बी. एम. शर्मा, ॲड. व्हि. जी. शहा, ॲड. दिपक गोडसे, श्री व्ही एन जोशी, सीए अविनाश मुजुमदार, प्रकाश पटवर्धन, ॲड. मिलिंद भोंडे, संतोष शर्मा,

ॲड. श्रीकृष्ण दीक्षित, ॲड. सुहास शहा, नरेंद्र सोनवणे, नवनीतलाल बोरा, शरद सूर्यवंशी, मनोज चितळीकर, सीए सुनिल भांडवलकर, ॲड. अभय बोरा आदी मान्यवर उपस्थित (Pune) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.