Pune : राजीव गांधी स्मारक समितीतर्फे केंद्र सरकारच्या निषेधार्थ पुण्यात स्वाक्षरी मोहीम

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात महिला (Pune) अत्याचार, मोठे उद्योजक गैरव्यवहार, हुकूमशाही कारभार या गोष्टी वाढीस लागलेले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये ठीक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असताना 300 टन आरडीएक्स असलेला ट्रक धडकून 4प जवान शहीद होणे ही बाब मोदी यांच्या परवानगी शिवाय शक्य नाही. महिला कुस्तीपटू यांच्यावर अत्याचार होऊ नये त्यांना न्याय मिळत नाही आदानी सारखे उद्योगपती कोट्यावधींचा भ्रष्टाचार करूनही त्यांना अभय मिळते केरळा फाइल्स चित्रपटाच्या माध्यमातून देशाला जाणीवपूर्वक दोन धर्मात विभागण्याचे काम केले जाते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.

शनिवारी व्यक्त केले पुण्यातील (अलका टॉकीज) टिळक चौकात राजीव गांधी स्मारक समितीतर्फे केंद्र सरकारच्या निषेधार्थ नागरिकांची सह्यांची मोहीम राबविण्यात आली यावेळी ते बोलत होते.

Maharashtra : विकसित भारत @2047 संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध – मुख्यमंत्री शिंदे
राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष गोपाळ (Pune) तिवारी प्रास्ताविकात म्हणाले, अदानी घोटाळ्यातील सत्य बाहेर येण्यासाठी ,पुलवामा हल्ल्यामागील निष्काळजीपणा हेतू उघडा होण्यासाठी, राष्ट्रीय महिला खेळाडूंना न्याय मिळण्यासाठी, नवीन संसद उद्घाटन प्रसंगी राष्ट्रपतींचा उचित सन्मान होण्यासाठी ,संविधानिक लोकशाहीला समर्थन देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या हुकूमशाही विरोधात ही स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली आहे.

मोदी सरकारकडे बहुमत असले तरी त्यांच्या विरोधात देशात जनतेने निवडून दिलेले 200 खासदार आहे ही बाब ते विसरत आहेत आणि हुकूमशाही पद्धतीने कारभार करत आहेत.काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी त्यांचे सदस्यत्व अडचणीत आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. पुलवामा सुरक्षेत त्रुटी राहिल्या त्यास जबाबदार कोण?

त्याचे नेमके सत्य काय? याबाबत केंद्राकडून कोणताही खुलासा केला जात नाही.तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मांडलेल्या भूमिकेवरही पंतप्रधानांनी त्यांचे मौन अद्याप सोडलेले नाही.

 याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष गोपाळदादा तिवारी,  शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व प्रवक्ते विजय कोलते युक्रांदचे संदीप बर्वे, ॲड अभय छाजेड, गणेश नलावडे, ॲड संदिप ताम्हणकर, सुभाष थोरवे, सुर्यकांत मारणे, भाऊ शेडगे, भोला वांजळे, धनंजय भिलारे, ॲड रविंद्र रणसिंग, ॲड फैयाज शेख, सौ सीमा महाडिक, संगीता भालेराव, द स पोळेकर, स्ंभाजी पायगुडे, राजेंद्र खराडे, सुरेश पारखी, राधिका मखामले, संजय अभंग, सुनिल कुंजीर, राजु साठे, धनश्याम निम्हण, नंदु येवले, नितीन रावलेकर, अण्णा गोसावी, महेश अंबिके, प्रशांत वेलणकर, किरण शिंदे, रवींद्र चौधरी, रमेश सोनकांबळे, सुरेश चौधरी, शंकर शिर्के, नरेश आवटे इ सह मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, परीसरातील नागरीक उपस्थित होते.

Maharashtra : विकसित भारत @2047 संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध – मुख्यमंत्री शिंदे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.