Pune: भरधाव रिक्षा दुभाजकाला धडकली, चालकाचा मृत्यू

Pune: speedy rickshaw hits divider, driver dies या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रकाश साबळे यांना येथील नागरिकांनी तात्काळ उचलून रुग्णालयात दाखल केले.

एमपीसी न्यूज- रामटेकडी येथील बीआरटी मार्गातून जाणारी भरधाव रिक्षा दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास झाला. प्रकाश बाबुराव साबळे (वय 50) असे मृत्यूमुखी पडलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश साबळे हे रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रामटेकडी येथील बीआरटी मार्गातून भरधाव जात होते. यावेळी त्यांचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या दुभाजकाला जाऊन धडकली.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रकाश साबळे यांना येथील नागरिकांनी तात्काळ उचलून रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार आधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.