Pune : विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्यास स्थायी समितीची मंजुरी

Standing Committee approves demolition of flyover at University Chowk

हिंजवडी ते शिवाजीनगर एलोव्हेटेड मेट्रोचा मार्ग मोकळा

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपूल पाडण्यासाठी अखेर स्थायी समितीने आज, मंगळवारी मंजुरी दिली. त्यामुळे आता हिंजवडी ते शिवाजीनगर एलोव्हेटेड मेट्रोचा मार्ग मोकळा झाला आहे.

या ठिकाणी उड्डाणपूल बांधताना महापालिका कोणताही खर्च देणार नाही, नवीन टेंडर मंजूर होईपर्यंत पूल पाडू नये आणि वाहतुकीचे नियोजन करावे, अशा उपसुचनेसह पूल पाडण्यासाठी मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकारांना दिली.

हा उड्डाणपूल पाडण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तर्फे हा उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे.

हा उड्डाणपूल चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आला आहे. त्यामुळे रोज सकाळी आणि सायंकाळी या पुलावर वाहतूक कोंडी होत असते.

त्यामुळे हा उड्डाणपूल पाडून नव्याने उड्डाणपूल उभारण्या येणार आहेत. तसेच उड्डाणपूल आणि मेट्रो यांचा एकात्मिक आराखडा करण्यात आला आहे.

पीएमआरडीएकडून त्याचे काम करण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल पाडून दुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी २४० कोटी रुपये खर्च होणार आहे. सध्याचा उड्डाणपूल 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता.

सध्या कोरोनाचे संकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे हा पूल तातडीने पाडून मेट्रोच्या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे.

त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना सूचना केल्या होत्या. तर हा पूल पाडण्यासाठी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.