Pune : ओटा मार्केटसाठी राखीव असलेल्या जागेवर भाजी मंडई सुरू करा – दिपाली धुमाळ

एमपीसी न्यूज – वारजे – माळवाडीमध्ये ओटा मार्केटसाठी राखीव असलेल्या जागेवर (Pune) भाजी मंडई सुरू करा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी माहापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

प्रभाग क्र. 32 वारजे – माळवाडीमधील वारजे सर्वे न 119 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज तलाव शेजारी पुणे महापालिकेची ओटा मार्केटसाठी आरक्षित जागा आहे. सध्या वारजे परिसरात अधिकृत भाजी मंडई कुठेही उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. फिरते भाजी विक्रेते आणि शेतकरी आठवडे बाजार यावर महापालिका कारवाई करते.

Maharashtra : नववर्षापासून स्वागत सेल’ महावितरण ची ग्राहक सेवा थेट औद्योगिक ग्राहकांच्या दारी

त्यामुळे महिलांना भाजी खरेदी करण्यासाठी इतरत्र फिरावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर ओटा मार्केट विकसित करण्यासाठी महापालिकेची आरक्षित जागा उपलब्ध आहे. या ठिकाणी महापालिकेच्या वतीने कायम स्वरूपी भाजी विक्रेत्यांसाठी गाळे बांधून भाजी मंडई सुरू करावी. या अगोदर सुद्धा या ओटा मार्केटच्या कामासाठी आम्ही निधी उपलब्ध करून दिलेला होता. कामही सुरू झाले होते. परंतु, पुरेसा निधी अभावी या ओटा मार्केटचे (Pune) बांधकाम स्थगित झाले.

या संदर्भात योग्य ती दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीसाठी सूचना द्याव्यात, अशी विनंती आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. अतिक्रमण व मंडई विभाग उपायुक्त आणि समाज विकास विभाग उपायुक्त यांनाही हे निवेदन पाठविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.