Pimpri : रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या 6 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय “रयत गौरव पुरस्कार 2023” सोहळा साजरा

एमपीसी न्यूज – रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचा सहावा वर्धापन दिन कार्यक्रम ॲटो क्लस्टर हॉल, (Pimpri)मोरवाडी,पिंपरी, पुणे या ठिकाणी पार पडला.वर्धापन दिनाच्या निमित्ताने पदाधिकारी स्नेहमेळावा व राज्यस्तरीय रयत गौरव पुरस्कार 2023 व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांसाठी विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पुरस्कारार्थी व प्रमुख म्हणून शिक्षण अधिकारी संजय नाईकडे (Pimpri)व मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी.लक्षण गोफणे महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य माधव सरोदे,ससून उपअधीक्षक सुजित धिवारे. तसेच यावेळी संस्थेच्या प्रगती कोपरे,श्वेता ओव्हाळ,प्रणाली कावरे, भाग्यश्री आखाडे,माधवी खरात,महेश गायकवाड,नीरज भालेराव,योगेश कांबळे,अजय चक्रनारायण, प्रशांत इंगळे,स्वराज कांबळे,अभिजित लगाडे,सचिन सूर्यवंशी,गाझी शेख,सिध्दार्थ सूर्यवंशी,निलेश आठवले,अजय यादव,अतुल वाघमारे,विकी वाघमारे,सागर गायकवाड,ऋषिकेश राजहंस,रोहित कांबळे,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

PCMC : दिव्यांग कल्याणकारी योजनेतंर्गत ‘हयातीच्या दाखल्याचे’ घरोघरी जाऊन होणार सर्वेक्षण

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व पुरस्कारार्थी कवी अनंत दादा राऊत यांनी काव्यसंमेलनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन,शिक्षणाचे महत्व सांगितले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांना साहित्य तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांना शिक्षण क्षेत्रातील व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांना आरोग्य क्षेत्रातील “रयत गौरव पुरस्काराने मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालयाला NACC मध्ये A++ श्रेणी प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाचा तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य.माधव सरोदे तसेच रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी महाविद्यालयास स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालय व प्राचार्य तसेच सामजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे आर.जी.जाधव,ससून हॉस्पिटलचे उप अधीक्षक सुजित धिवारे,प्रथम संस्थेच्या पदाधिकारी ललिता भंडारे,रिल्स स्टार दिव्या शिंदे,इव्हेंट ऑर्गनायझर साबीर शेख यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे प्रवक्ते प्रा.विक्रांत शेळके यांनी केले तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी केली.आभार प्रदर्शन पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अभिषेक चक्रनारायन यांनी व्यक्त केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.