BNR-HDR-TOP-Mobile

Pune : वानवडी येथील कमांड हॉस्पिटलमधून एक संशयित पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज- पुण्यातील लष्कराच्या कमांड हॉस्पिटलच्या परिसरात संशयीतरित्या फिरणाऱ्या एका व्यक्तीला काल रात्री 9 च्या दरम्यान ताब्यात घेऊन वानवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या कमांड हॉस्पिटलच्या परिसरात एक व्यक्ती आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेजचा युनिफॉर्म घालून फिरत होता. त्यावेळी लष्कराच्या जवानांना त्याचा संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर जवानांनी त्याची कसून चौकशी करून झडती घेतली असता त्याच्याजवळ काही बनावट कागदपत्रे आणि काही वस्तूही मिळाल्या

लष्कराने या व्यक्तीला वानवडी पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3