Pune : मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त संतपीठात जय श्रीराम नामाचा गजर

एमपीसी न्यूज -जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल (Pune)अँड ज्यु. कॉलेज मध्ये जय श्रीराम नामाने, शाळेचा परिसर दुमदुमला.

शाळेचे संचालक ह .भ. प. राजू महाराज ढोरे ,संचालिका डॉ. स्वाती मुळे , प्राचार्य .डॉ. ज्ञानेश्वर गाडगे ,मुख्याध्यापिका स्नेहल पगार , समन्वयिका मयुरी मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत 22 जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या,प्रभू श्रीरामचंद्र मूर्ती प्रतिष्ठापनेच्या उत्सवानिमित्त उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सर्व- विद्यार्थ्यांनी रामरक्षा स्तोत्रपठण केले.

कला शिक्षिका मुग्धा शिरोडकर, सपना बांगर यांच्या प्रयत्नातून प्रभू श्रीरामांचे नाव व शाळेचे नाव विद्यार्थ्यांच्या बैठकव्यवस्थेतून साकारण्यात आले.

शाळेचे शिक्षक सखाराम पितळे, राजाराम- फड, भालचंद रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वि‌द्यार्थ्यांनी हनुमान चालीसा पठण केले .

Pimpri: विक्रीसाठी आणलेल्या गुटख्यासह  तरुणाला अटक

अयोध्या येथे होणाऱ्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जाधववाडी येथील रामायण मैदानावर रामायणातील रामासह विविध पात्रांची वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. चार गटात पार पडलेल्या या स्पर्धेत संतपीठ शाळेतील अनेक विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. त्यामध्ये पूर्व प्राथमिक गटातील रियांश टोंगसे या नर्सरीच्या विद्यार्थ्यांने द्वितीय क्रमांक पटकावला.

 

 

प्राथमिक गटात संतपीठ शाळेतील इयत्ता तिसरीचे विद्यार्थी आदित्य दांडगे आणि वेदांत दांडगे या विद्यार्थ्यांनी सामूहिक गटात लव- कुश वेशभूषा परिधान करून द्वितीय क्रमांक मिळवला. तर तिसऱ्या गटात आरव जाधव, श्रीराज वडशंकर, श्लोक जाधव आणि साईश बहिरट यांना वैयक्तिक वेशभूषेत बक्षीस मिळाले. समूह नाटिकेत श्राव्या मुळूक ज्ञानेश्वरी घोरपडे, सान्वी गोडसे, पियुषा लोंढे प्रत्युष लोंढे, संस्कृती आणि श्लोक जाधव यांना बक्षीसे मिळाली. यावेळी पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षकांनी
सहभाग नोंदवला.

संतपीठ शाळेत श्रीराम प्रभूंच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामध्ये संतपीठ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राम मंदिर ते टाळगाव चिखलीचे गणेश मंदिरापर्यंत भजन गात, पावली खेळत ‘श्री राम’ नामाचा गजर करत प्रभात फेरी काढण्यात आली.

संतपीठतील काही विद्यार्थ्यांनी भोसरी येथील तुकाराम नगर येथे जाऊन विद्यार्थ्यांनी सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण केले.

संतपीठ शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी श्री.प्रभू रामांची बैठक व्यवस्थेतून आकृती रेखाटली व सामूहिक रामरक्षा स्तोत्राचे पठण करून श्री प्रभुरामांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पिंपरी-चिंचवड विभागाच्या संस्कार भारतीचे अध्यक्ष श्री. सचिन काळभोर , लीनाताई आढाव, नवीन बग, रामदास भांगरे व ऋषिकेश मोरे यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृत विभागाचे शिक्षक सखाराम सखाराम पितळे सर यांनी केले. डॉ.ह.भ.प. प्राचार्य ज्ञानेश्वर गाडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पालक प्रतिनिधी नवीन बग यांनी आभार मानले .

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.