Pune : येरवडा भागात वाहनांची तोडफोड करत कोयते उगारून टोळक्याची दहशत

एमपीसी न्यूज – येरवड्यातील पांडू लमाण वसाहतीत टोळक्याने कोयते उगारून दहशत माजवत वाहनांची ( Pune) तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी सोहम शशी चव्हाण आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जुगनू राकेश परदेशी (वय 40, रा. भोरी चाळ, पांडू लमाण वसाहत, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : शिवजयंतीनिमित्त आज वाहतुकीत बदल

आरोपी चव्हाण आणि परदेशी ओळखीचे आहेत. चव्हाण आणि साथीदार शनिवारी पांडू लमाण वसाहतीत शिरले. त्यांनी शिवीगाळ करून नागरिकांना कोयत्याचा धाक दाखविला. कोयते उगारून दहशत माजविली. परदेशी यांचा भाचा अनिकेत सोनकरला मारहाण केली. या भागातील वाहनांची तोडफोड करून टोळके पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक सुर्वे तपास करत ( Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.