Pune : ड्रेनेजच्या चेंबरमध्ये पडकलेल्या वासराला ‘अग्निशामक’ कडून जीवदान

एमपीसी न्यूज – येरवडामधील न्यू अमेन्स कॉलनीतील सुमारे २० फूट खोल ड्रेनेज चेंबरमध्ये पडकलेल्या वासराला सुरक्षित बाहेर काढून येरवडा अग्निशामक केंद्राच्या अधिकारी आणि जवानांनी जीवदान दिले. यावेळी स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केल्याचे येरवडा अग्निशामक केंद्राचे प्रभारी अधिकारी सुभाष जाधव यांनी सांगितले

याबाबत येरवडा अग्निशामक केंद्राचे प्रभारी अधिकारी सुभाष जाधव यांनी सांगितले कि, सकाळी ८.२९ वाजता येरवडा अग्निशामक केंद्रात वासरू ड्रेनेज चेंबरमध्ये पडल्याचे एकाने फोन करून सांगितले होते. त्यानुसार वर्दी नोंद करून घटनास्थळी येरवडा अग्निशामक केंद्रातील अधिकारी आणि जवान पोहचलो. येरवडामधील न्यू अमेन्स कॉलनीत सुमारे २० फूट खोल ड्रेनेज चेंबर आहे. तसेच त्याला स्लॅब टाकलेला आहे.

  • याठिकाणी गायी, वासरू काहींनी सोडल्याचे स्थानिकांनी सांगितले होते. त्यामुळे येथे गायी, वासरू आदी पाळीव प्राण्याची भटकंती होत असते. याठिकाणी येरवडामधील न्यू अमेन्स कॉलनीत सुमारे २० फूट खोल ड्रेनेज चेंबरमध्ये वासरू केव्हा पडले? हे कोणाला माहित नव्हते. परंतु, ते वासरू ओरडत होते. हे ऐकून एकाने येरवडा अग्निशामक केंद्रात फोन केला होता. ड्रेनेज चेंबर खूप खोल असल्याने वासराला बाहेर काढणे मुश्किल होते. यावेळी येरवडा अग्निशामक केंद्राचे प्रभारी अधिकारी सुभाष जाधव, तांडेल महेश मुळीक, राजाराम केदारी हे होते.

यावेळी मनुष्यबळ कमी पडत असल्याने येरवडा अग्निशामक केंद्रात फोन करून आणखी फायरमन नवनाथ वायकर, उमेश दगडे यांना बोलवून घेतले. तसेच रेसकयु व्हॅन बोलावली. दोरीच्या साहाय्याने सुरक्षितपणे सुमारे २० फूट खोल ड्रेनेज चेंबरमध्ये पडलेल्या वासराला सकाळी ९. ५५ वाजता बाहेर काढले.

  • यावेळी ‘त्या’ वासराला नीट उभे राहता येत नव्हते. यावेळी स्थानिक नागरिक गोरक्षक रोहित लोंढे, सुशांत साठे यासह आदींनी सहकार्य केले. यावेळी ‘अग्निशामक’मुळे वासराला जीवदान मिळाल्याचे बोलले जात होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.