Pune: वारजेतील टेकडीवर लागलेल्या आगीचे वनविभागाला नाही गांभिर्य

एमपीसी न्यूज – वारजेतील डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर (Pune)दरम्यान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव समोरील टेकडीवर आग लागून सर्व झाडें जळून खाक झाली. सलग 3 दिवसापासून आग लागल्याची घटना घडत आहे. त्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. मात्र, या अधिकाऱ्यांना त्याचे काहीही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. 
सोसायटीचे पदाधिकारी, सभासद, शाळांचे विद्यार्थी, (Pune)सामाजिक संस्था, कंपनीचे कर्मचारी, मंडळाचे कार्यकर्ते, बांधकाम व्यावसायिक, शासकीय सेवक, इत्यादीनी या टेकडीवर वृक्षरोपण केलेले आहे. वारजे अग्निशमन केंद्रच्या सेवकांनी प्रयत्न करून आग विझविण्याचा प्रयत्न केला आहे.

या टेकडीवर मागील 8 – 10 वर्षांपासून वृक्ष लावण्यात आली आहेत. ही वृक्ष जगविण्यासाठी पाण्याची कमतरता आहे. सलग 3 दिवस झाले आग लागते आहे. त्याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी केला आहे.
वनसंरक्षन अधिकारी लक्ष देत नाही. या टेकडीवर सुरक्षा रक्षक तैनात नाही. त्यामुळे या टेकडीची सुरक्षा धोक्यात आली आहे, असेही धुमाळ यांनी सांगितले. नागरिकांनी धुमाळ यांना फोन करून या प्रकारची माहिती दिली असता, त्वरित अ्गिशमन केंद्रातील सेवकांना बोलावून घेतले. स्वतः या ठिकाणी जाऊन वनविभाग सेवकांना बोलविल्याचेही ते म्हणाले. भविष्यात अशा प्रकारच्या आगीच्या घटना घडू नये, यासाठी वनविभागाने सतर्क राहण्याचे आवाहन धुमाळ यांनी केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.