Pune : पुणे पोलिस आयुक्तांनी तडकाफडकी सात पोलिसांचे केले निलंबन, दोन पोलीस निरीक्षकांचाही समावेश

एमपीसी न्यूज – कोयता गँग, खून तसेच भरदिवसा तरुणीवर झालेला (Pune) हल्ला यामुळे पुणे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. याच चित्राला बदलण्यासाठी डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करत पुणे पोलिस आयुक्तांनी कामात कसुर केल्याप्रकरणी सात पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले आहे.यात दोन वरीष्ठ पोलीस निरीक्षकांचाही समावेश आहे. पुणे पोलिसांच्या इतिहासात निलंबनाची पहिलीच मोठी कारवाई आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दोन पोलिस निरीक्षकांसह सात जणांना निलंबित करण्याचे आदेश गुरुवारी दिले. सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मनोज एकनाथ शेंडगे, सहायक निरीक्षक समीर विठ्ठल शेंडे, पोलिस उपनिरीक्षक हसन मकबूल मुलाणी, पोलिस उपनिरीक्षक मारुती गोविंद वाघमारे, पोलिस हवालदार संदीप जयराम पोटकुले आणि पोलिस हवालदार विनायक दत्तात्रेय जांभळे अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.

Chakan : नमाज पठनानंतर कुर्बानी रद्द करण्याचा निर्णय जाहीर;चाकण मध्ये सामाजिक एकोप्याचे दर्शन

याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले की, पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकांची तक्रार नोंदवून तातडीने कारवाई करावी, असे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. पोलिसांनी वेळीच दखल घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केल्यास गुन्हे घडणार नाहीत. आदेशाचे पालन न केल्यामुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात (Pune) आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.