Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उद्यापासून बंद

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव पुण्यामध्ये वाढत असल्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे उद्या (दि. १७ मार्च २०२०) पासून जनहितार्थ मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर तसेच परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मंदिर सुरू करण्यात येणार आहे. भाविकांनी मंदिर परिसरात न येता ऑनलाइन दर्शन घ्यावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.